भुलाभाई देसाई मेमोरिअल इन्स्टिट्यूट, वालचंद टेरेस आणि छबिलदास मुलांची शाळा
‘प्रायोगिक रंगभूमीचा हा मौखिक इतिहास आहे’ असे म्हणताना मुळातच ती रंगभूमी प्रायोगिक होती किंवा नव्हती - असा ग्रंथाच्या प्रमेयालाच अडचणीत आणणारा प्रश्न या ग्रंथामध्ये कुठेकुठे उपस्थित केला गेला आहे. प्रायोगिक रंगभूमीचा मौखिक इतिहास आम्ही सिद्ध करतो आहोत, याचा अर्थच मुळी ती रंगभूमी प्रायोगिक होती हे गृहित धरलेले आहे, असे संपादक शांता गोखले त्यांच्या प्रस्तावनेमध्ये नि:संदिग्धपणे म्हणत नाहीत.......